पुणे : पुण्यातील शिंदे समर्थक नगरसेवक प्रमोद (नाना) भानगिरे यांनी उभारलेल्या उद्यानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव देण्यात आले होते. आज मुख्यमंत्री पुण्याच्या दौऱ्यावर येणार असल्याने त्यांच्याच हस्ते या उद्यानाचे उद्घाटन होणार होते. मात्र हे उद्यान आणि त्याचा उद्घाटन कार्यक्रम वादाच्या भवऱ्यात सापडल्याने अखेर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. पुण्यातील हपडसर परिसरात हे उद्यान उभारण्यात आले आहे. मात्र ही जागा मुळात महानगरपालिकेच्या मालकीची आहे. त्यात या उद्यानाला मुख्यमंत्री शिंदे यांचे नाव दिल्याने अनेक स्वयंसेवी संस्था आणि संघटनांनी या नावाला विरोध केला. त्यामुळेच उद्यानाचे उदघाटन रद्द करण्यात आले आहे.
या उद्यानाला नियमबाह्य पद्धतीने नाव देण्यात आलेले आहे, असे या संघटनांचे म्हणणे आहे. कारण या नामकरणाला पुणे प्रशासनाकडून कोणतीही प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली नाही. यावर प्रमोद भानगिरे यांचे म्हणणे आहे कि, या उद्यानासाठी करण्यात आलेला सर्व खर्च त्यांनी स्वतः केलेला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या आयुक्तांसह झालेल्या बैठकीत या परिसरातील नागरिकांनीही मुख्यमंत्री शिंदे यांच्या नावाला सहमती दिली होती. तर दुसरीकडे हडपसरमध्येच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आलेल्या फुटबॉल मैदानाचे उदघाटनही शिंदेंच्या हस्ते आज पार पडणार होते.
या दोन्ही कार्यक्रमाविषयी प्रशासनाला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. हे प्रकल्प पुणे प्रशासनाच्या अंतर्गत येत असल्याने उद्घाटन सोहळा हा प्रशासनाने आयोजित करणे अपेक्षित असते. भानगिरे यांना उदघाटन समारंभ घेण्याचे हक्क नाहीत त्यामुळे हे दोन्ही कार्यक्रम रद्द करण्यात आले असून उद्यानाच्या नावाचा बोर्डही झाकण्यात आला आहे. तर मुख्यमंत्री शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखेच स्वतःच्याच नावाच्या वास्तूचे उद्घाटन करणार असल्याने त्यांच्यावर टीका होत होत आहे.
आज सासवडमध्ये शिंदे यांची सभा
सासवडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. माजी आमदार विजय शिवतारे यांच्या परिसरात ही सभा होणार आहे. दुसरीकडे राज्यभरात आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेला सुरुवात होत आहे. बंडखोरी करून उद्धव छावणी सोडलेल्या आमदारांच्या भागात आदित्य ठाकरे जात आहेत. एकनाथ शिंदे आज सायंकाळी 7 वाजता पुण्यातील कात्रज चौकात आमदार तानाजी सावंत यांच्या घरी भेट देणार आहेत.आदित्य ठाकरे पुण्यातील कात्रज येथे शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत, त्याचवेळी मुख्यमंत्री येथे उपस्थित राहणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- Chandrakant Patil VS Sharad Pawar |शरद पवारांच्या पुरंदरेंवरील टीकेवर चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर
- Ashok Chavan | काँग्रेस सोडण्याच्या चर्चेवर अशोक चव्हाण यांनी केला खुलासा! म्हणाले…
- Supreme Court | ठाकरे कि शिंदे, कोणाच्या बाजूने लागणार निकाल?; उद्या होणार सुनावणी
- Chandrakant Patil | “स्वतःला प्रोजेक्शन मिळवण्यासाठी” ; पवारांच्या पुरंदरेंवरील टीकेवर चंद्रकांत पाटलांचा पलटवार
- Ayman Al-Zawahiri | अल-कायदा प्रमुख अल-जवाहिरी काबूलमध्ये अमेरिकेच्या गुप्त ऑपरेशनमध्ये ठार
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<