पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृध्द महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

औरंंगाबाद : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवर आलेल्या मंगळसूत्र चोरट्यांनी ज्योतीनगरातून पायी जाणाऱ्या शंकुतला बियाणी (वय ६५) या वृध्द महिलेच्या गळ्यात पाच ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून नेले.

हि घटना मंगळवारी सायंकाळी घडली असल्याची माहिती उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या निरीक्षक गिता बागवडे यांनी दिली. यावेळी चोरट्यासोबत झालेल्या झटापटीत शंकुतला बियाणी या जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

याप्रकरणी मंगळसूत्र चोरट्याविरूध्द उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक गिता बागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक राहुल सुर्यतळ करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या