अंबानींच्या घराबाहेरील स्फोटके प्रकरणातील अधिकारी बदलला, ‘हा’ अधिकारी करणार तपास

mukesh ambani

मुंबई : भारतातील श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळल्याने खळबळ उडाली होती. मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनचा साठा सापडला होता. या स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली होती त्यामधून घातपाताची धमकी दिल्याचं समजतं आहे.

मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आल्याच्या गुन्ह्याचा तपास अधिकारी बदलण्यात आला आहे. क्राईम ब्रँचच्या सीआययु युनिटचे एपीआय सचिन वाझे यांच्या ऐवजी तपास सहायक पोलीस आयुक्त नितीन अल्कनुरे यांच्याकडे सोपवण्यात आला असल्याची माहिती आहे.

सचिन वाझे यांच्या ऐवजी हा तपास आता सहायक पोलीस आयुक्त नितीन अल्कनुरे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. २५ फेब्रुवारी रोजी घटना उघडकीस आली आहे. घटना घडून आता एक आठवडा होत आहे मात्र, तपासात काहीच प्रगती नाही. यामुळे आता हा तपास सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला असल्याचं म्हटलं जात आहे.

२४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १ वाजता अंबानी यांच्या घराजवळ ही कार ठेवण्यात आली होती. तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी ही कार पोलिसांच्या निदर्शास आली होती. ही घटना उघडकीस येताच या घटनेचा तपास क्राईम ब्रांचच्या सीआययु युनिट कडे देण्यात आला होता. या युनिटचे प्रमुख ए पी आय सचिन वाझे हे आहेत. वाझे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ या घटनेचा तपास सुरू केला होता. मात्र, तपासात प्रगती नसल्यानं तपास अधिकारी बदलण्यात आले आहेत. २५ ते २८ फेब्रुवारी या काळात सी आय यु चे पथक तपास करत होतं. मात्र,आता या गुन्ह्याचा तपास अधिकारी बदलण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या