उत्पन्न अहवालासाठी लाच घेताना मंडल अधिका-यास पकडले

सोलापूर  : शासकीय योजनांसाठी लागणाऱ्या उत्पन्नाची पडताळणी करून तहसीलदारांना अहवाल देण्यासाठी व प्रस्तावावर सही करण्यासाठी गौडगाव (ता. बार्शी) चे मंडल अधिकारी संतोषकुमार हिरेमठ यांना सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. यातील तक्रारदार व नऊ जणांनी शासकीय योजनांसाठी अर्ज केले आहेत.

त्यासाठी उत्पन्नाची पडताळणी करून तहसीलदारांना अहवाल देण्यासाठी व प्रस्तावावर सही करण्यासाठी मंडल अधिकारी हिरेमठ यांनी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानुसार तीन हजार रुपये देण्याघेण्याचे ठरले. तक्रारादाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दिली. त्या तक्रारीची खात्री करून पंचायत समितीच्या शेजारी असलेल्या चहा गाड्याजवळ लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने हिरेमठ यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले.

पोलीस उपायुकत संदीप दिवाण, अपर पोलीस अधीक्षक दिलीप बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरचे अरूण देवकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी हिरेमठ यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात सुरू होते

You might also like
Comments
Loading...