मराठवाडा रेल्वे कृती समितीचे पदाधिकारी दिल्लीला रवाना, रेल्वे प्रश्नी घेणार केंद्रीय मंत्री डॉ. कराड, दानवेंची भेट!

औरंगाबाद : औरंगाबाद पिटलाईनसह अनेक रेल्वे प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडविण्यात यावे यासाठी मराठवाडा रेल्वे कृती समितीचे पदाधिकारी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची गुरुवारी (दि.२२) भेट घेणार आहेत. तसेच शुक्रवारी (दि.२३) रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचीही भेट घेऊन रेल्वे प्रश्न सोडविण्यात यावे अशी मागणी केली जाणार आहे.

डॉ. भागवत कराड यांच्या रुपाने शहराला पहिल्यांदाच केंद्रात मंत्रीपद मिळाले आहे. कराड यांच्या मंत्रिमंडळात प्रवेशामुळे रेल्वे प्रश्न सुटतील अशी अपेक्षा आहे. याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात रावसाहेब दानवे यांना रेल्वे राज्यमंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रश्न नक्कीच मार्गी लागतील अशी अपेक्षा रेल्वे घेऊन मरठवाडा रेल्वे कृती समितीचे पदाधिकारी डॉ. भागवत कराड आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भेटीला गेले आहेत.

शुक्रवारी डॉ. कराड यांची भेट घेऊन औरंगाबाद मध्ये पिटलाईन व्हावी. तसेच औरंगाबाद-मनमाड दुहेरीकरणाचे कामे मार्गी लावावे, चाळीसगाव-औरंगाबाद तसेच रोटेगाव-कोपरगाव, औरंगाबाद-नगर रेल्वे मार्ग व्हावा. याशिवाय औरंगाबाद-गोवा तसेच औरंगाबाद-अहमदाबाद, औरंगाबाद-बंगलोर, औरंगाबाद-नागपूर मार्गे नवीन रेल्वे सुरू करण्यात याव्यात. अशा मागण्या मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर, राजेश मेहता, राजेंद्र वाणी, वर्धमान जैन सह आदींच्या वतीने करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP