राजू शेट्टींना विधानपरिषदेची ऑफर दिल्याने राष्ट्रवादीमध्ये उफाळला प्रचंड असंतोष

sharad pawar and raju shetty

कोल्हापूर : एकीकडे राज्यात कोरोनाचं संकट आ वासून उभं असताना दुसरीकडे राजकीय घडामोडी मात्र वेगाने घडत आहेत. ६ जून रोजी विधानपरिषदेतल्या राज्यपाल नियुक्त १२ जागा रिक्त झाल्यानंतर त्या जागांवर नव्या सदस्यांच्या नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी हे विधान परिषदेत निवडून जाण्याची शक्यता आहे. राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेच्या काही जागा रिक्त होत आहेत. त्यातल्या एका जागेवर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आमदार व्हावं, अशी खुली ऑफर राष्ट्रवादीने शेट्टी यांना दिली आहे.

या ऑफरबाबत राजू शेट्टी यांना विचारलं असता ते म्हणाले की, ‘प्राथमिक चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार यांच्याशी यासंदर्भात थेट बोलणं झालेलं नाही. जयंत पाटील माझ्या आईच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले होते, त्यावेळी आमच्यात प्राथमिक चर्चा झाली. यापुढे अजूनही चर्चा होणार आहे’.

मात्र राष्ट्रवादीने राजू शेट्टी यांना ऑफर दिल्याने कोल्हापूर मधील कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेतल्याच चित्र आहे. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जोरदार असंतोष उफाळला असून जुन्या जाणत्या नेत्यांमध्ये नाराजी नाट्याचा अंक सुरु झाला आहे.

धनुभाऊ लवकर बरे व्हा ! युवक औरंगाबादहून भगवान गडावर मशाल घेऊन निघाला

विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी प्रत्येक पक्ष आपापल्या पक्षाच्या कोट्यातून उमेदवार शोधण्यासाठी धडपडत आहे. ही ऑफर दिल्यानंतर कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीच्या पक्ष स्थापनेपासून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील निष्ठावंत कार्यकर्ते पक्षासाठी एकनिष्ठ राहिलो आहोत. पवार साहेब जो शब्द देखील तो नेहमी पाळतो. मग विधानपरिषद परिषदेसाठी आम्हा निष्ठावंतांना का डावलले जाते, असा सवाल आता राष्ट्रवादीचे निष्ठावंत विचारात आहेत.

राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीने ऑफर दिली. मात्र राष्ट्रवादीतील निष्ठावंतांना डावलल जातेय, हे योग्य नाही. आम्ही पक्षश्रेष्ठीकडे चर्चा करणार आहे. अस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कोल्हापूर शहर अध्यक्ष आर. के. पोवार यांनी सांगितल आहे. मात्र पक्षश्रेष्ठी याकडे लक्ष देतात का हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कोरोनावर लवकरच लस मिळेल, नितीन गडकरींनी व्यक्त केला विश्वास