दहशतवादी हल्ल्यापेक्षा खड्यांमुळे बळींची संख्या जास्त- सुप्रीम कोर्ट

टीम महाराष्ट्र देशा : खड्यांमुळे होणाऱ्या मृत्यांच्या मुद्यावरून सुप्रीम कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दहशत वादी हल्ल्यात जेवढे लोक मरतात त्यापेक्षा जास्त मृत्यू खड्यांमुळे होतो असं म्हणत सुप्रीम कोर्टाने सरकारला चांगलच फटकारले आहे. त्याचबरोबर कोर्टाने रस्ते सुरक्षा समितीला खड्यांमुळे जखमी किवा मृत्यू पावलेल्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाई बाबत आपल म्हणणं सादर करण्यास सागितलं आहे.

रस्ते वाहतूक अपघात झाल्यास कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळत नसल्यामुळे सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली. वाहनांचा थर्ड पार्टी इन्शुरन्स असावा तसेच सरकारने १ सप्टेंबर पूर्वीच हे लागू करावं असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. खड्यांमुळे देशात रोज १० मृत्यू होत आहेत. तर महाराष्ट्रात वर्षात ७२६ खड्ड्यांमुळे बळी गेले.

Loading...

रस्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. गतवर्षी देशात खड्ड्यांमुळे ३ हजार ५९७ जणांना प्राण गमवावे लागले यात महाराष्ट्रातील ७२६ जणांचा समावेश आहे.
२०१६ च्या तुलनेत गतवर्षी खडडेबळींच्या संख्येत साधारण ५०% एवढी वाढ झाली आहे. २०१७ मध्ये तीन हजार ५९७ जणांची खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या दुपटीवर पोहोचली आहे. राज्यात २०१७ साली ७२६ जन मृत्यू मुखी पडले. राज्यभरात रस्ते वाहतुक सुरक्षेबाबत असलेली हलगर्जी यातून अधोरेखित होत आहे उत्तर प्रदेशात सर्वाधिक म्हणजे साधारण ९८७ बळी हे खड्ड्यांमुळे गेले झाले आहेत.

अखेर नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द!

 

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
भाजपचा 'हा' नेता भेटला अजित पवारांना;राजकीय तर्कवितर्कांना उधान
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ