विद्यापीठात सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्यात येणार

uni pune

पुणे : सावित्राबाई फुले विद्यापीठात गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी संघटनांमध्ये तणावाच वातावरण  निर्माण झाल होत.  विद्यापीठात सुरक्षा रक्षक कमी असल्यामुळे  विद्यार्थांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर  विद्यापीठाने सुरक्षा रक्षक वाढवण्याचा  निर्णय घेतला आहे.

विद्यापीठात अधिसभा (सिनेट) निवडणूक जवळ आली असून सुरक्षेच्या दृष्टीने  पुणे विद्यापीठाकडून सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्यात आली आहे. डॉ नितीन करकळकर म्हणाले विद्यापीठात एकूण १५० सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत. यामध्ये महिला व पुरुष दोघांचाही समावेश असेल तसेच रखडलेल्या सुरक्षा भिंतीचे काम सुरु करण्यात  येणार आहे. सोबत  विद्यापीठ परिसरात सीसी टीव्ही कॅमेरा वाढवण्यात येणार असून स्ट्रीट लाईट ची संकल्पना सुद्धा राबवण्यात येणार आहे.