महाराष्ट्र सावरतोय : रुग्णसंख्येत घट होतेय, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

maharashtra corona

नवी दिल्ली : मार्च महिन्यापासून महाराष्ट्रासह देशभरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने स्थिती गंभीर बनली आहे. तर, राज्यात वेळीच कडक निर्बंध लागू केले गेल्याने त्याचे काहीसे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर ताण कायम असला तरी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक दिलासादायक माहिती दिली आहे.

देशातील कोरोना परिस्थितीबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज पत्रकार परिषद घेऊन देशातील कोरोना स्थितीची माहिती दिली आहे. यावेळी काही राज्यांमध्ये नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश राज्यांचा समावेश आहे.

महत्वाचं म्हणजे २७ एप्रिल २०२१ पासून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख घसरता आहे. यासोबतच, महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रकरणं घटल्याचं केंद्रीय आरोग्य सचिव सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ६० हजारांहून अधिक रुग्णांची दररोज वाढ होत होती. आरोग्य मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात ५६ हजार ६४७ नवीन रुग्णांचे निदान झालं आहे.तर ५१ हजार ३५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

महत्वाच्या बातम्या