भारतात 1930 पासून योजनाबद्ध पद्धतीने मुस्लिमांची संख्या वाढवण्यात आली- भागवत

mohan bhagwat

गुवाहाटी: भारतात 1930 पासून योजनाबद्ध पद्धतीने मुस्लिमांची संख्या वाढवण्यात आली. भारतात बंगाल, असाम आणि सिंधला पाकिस्तान बनवण्याची योजना होती. पण, ही योजना पूर्णपणे यशस्वी झाली नाही आणि विभाजन होऊ फक्त पाकिस्तान तयार झाला असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.

मोहन भागवतांनी गुवाहाटीमध्ये असामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्या उपस्थितीत NRC-CAA वर लिहीलेल्या एका पुस्तकाचं प्रकाशन केलं. यावेळी त्यांनी CAA-NRC बाबत मुस्लिमांच्या मनात असलेली शंका दूर करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, NRC-CAA मुळे हिंदू-मुस्लिम विभाजन होईल, असे दाखवण्यात आले. हा एक राजकीय फायद्यासाठी रचलेला कट आहे असं ते म्हणाले.

दरम्यान, यावेळी बोलताना मोहन भागवत यांनी सीएएमुळे देशातील अल्पसंख्याकांना संरक्षण मिळेल, असं देखील नमूद केलं आहे. “स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की देशातील अल्पसंख्याकांची काळजी घेतली जईल. ते अजूनही केलं जात आहे. आपण यापुढेही ते करतच राहू. यासंदर्भात आपण इतर देशांमध्ये असलेल्या बहुसंख्यकांशी देखील चर्चा केली. यापैकी कुणाला जर धोका किंवा भितीमुळे भारतात यायची इच्छा असेल, तर आपण नक्कीच त्यांना मदत करायला हवी”, असं देखील भागवत म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

IMP