भारतातील कोरोना रुग्ण संख्या २ कोटींवर

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण वाढला आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन, बेड्स, व्हेंटिलेटर आणि औषधांचाही तुटवडा जाणवत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून रुग्ण वाढीचा दर इतर देशांच्या तुलनेत सर्वात जास्त झाला आहे. भारतात पहिला रुग्ण आढळल्यापासून आतापर्यंत कोरोना रुग्ण संख्या २ कोटींच्या वर गेली आहे. म्हणजेच रुग्ण संख्येच्या बाबत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे.

भारतात रुग्ण संख्या वाढीचा दर सध्या सर्वाधिक आहे. आतापर्यंत दोन कोटींवर लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. रुग्ण वाढीचा हा वेग कायम राहिल्याच याच महिन्यात भारतातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा ३ कोटींच्या वर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भारतातील दोन कोटी रुग्णांपैकी १ कोटी ६६ लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या सुमारे ३५ लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात आतापर्यंत सुमारे २ लाख २२ हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहे.

महत्त्वाच्या बातम्या