दिलासादायक : पिंपरी-चिंचवडमध्ये ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या १ हजाराखाली

pcmc

पिंपरी-चिंचवड : गेल्यावर्षी पासून कोरोनाने देशासह जगभरात थैमान घातला आहे. तर, पहिल्या लाटेत मुंबई, पुण्यापाठोपाठ सर्वाधिक धोका हा पिंपरी-चिंचवड शहरात असल्याचे कोरोना रुग्णसंख्येवरून समोर आले होते. उद्योगनगरी म्हणून नावाजलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाने दुसऱ्या लाटेत देखील कहर माजवला होता.

मात्र, आता पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना स्थिती आटोक्यात येत असून शहरातील निर्बंध देखील शिथिल करण्यात येत आहेत. तर, आता पिंपरी-चिंचवड वासियांसाठी आणखी एक दिलासादायक वृत्त समोर येत आहे. शहरातील सक्रिय (ऍक्टिव्ह) रुग्णांची संख्या १ हजाराखाली आली आहे. सध्या ९९४ सक्रिय रुग्ण पिंपरी०चिंचवड महापालिका हद्दीत असून आज शहरात नव्याने १९४ कोरोना बाधित रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे.

यासोबतच, आज ४८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज मनपा हद्दीत ४ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाचा धोका हा पूर्णपणे टळला नसून योग्य खबरदारी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे कोरोना नियमांचं पालन करण्यासह योग्य काळजी घेणे गरजेचं आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP