मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत असतांना सरसंघचालक मोहन भागवत(Mohan Bhagavat) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. हिंदूंशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू नाहीत असे ते म्हणाले आहेत. तसेच भारत आणि हिंदूंना वेगळं केलं जाऊ शकत नाही असेही ते म्हणाले आहेत.
यावेळी बोलत भागवत म्हणाले की,’भारत आपल्या पायांवर स्वत: उभा राहिला. हेच हिंदुत्वाचं सार आहे, याच कारणामुळे भारत हिंदूंचा देश आहे.’ तसेच पुढे फाळणीचा उल्लेख करत ते म्हंटले की, ‘फाळणीनंतर भारताचे तुकडे झाले आणि पाकिस्तानची निर्मिती झाली. आरण हिंदू आहोत ही संकल्पना विसरल्यामुळेच हे झालं. तेथील मुस्लीमदेखील हे विसरले होते. तसेच आधी स्वतःला हिंदू समजणाऱ्यांची ताकद कमी झाली, नंतर त्यांची संख्या कमी झाली. म्हणूनच पाकिस्तान भारत राहिला नाही,’ असेही ते म्हणाले.
हिंदूंशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू नाहीत असं वकव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. हिदूंची संख्या आणि ताकद कमी होत आहे किंवा हिंदुत्वाची भावनाच कमी होत आहे असंही ते म्हणाले आहेत. #mohanbhagwat Mohan Bhagwat #Hindutva #Hindu pic.twitter.com/FekF4UAfqo
— Shivraj Yadav | शिवराज यादव 🇮🇳🖊️ (@shiva_shivraj) November 28, 2021
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’हिदूंची संख्या आणि ताकद कमी होत आहे किंवा हिंदुत्वाची भावनाच कमी होत आहे. भारत हिंदुस्थान असून हिंदू आणि भारत वेगळे होऊ शकत नाहीत. जर हिंदूंना हिंदू राहायचं असेल तर भारताने अखंड होण्याची गरज आहे.’ यापूर्वी मोहन भागवत यांनी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना फाळणीच्या वेळी भारताने सहन केलेल्या वेदना विसरल्या जाऊ शकत नाही असं म्हटलं होतं.
महत्वाच्या बातम्या:
- …या दोन वर्षांत प्रकृती बिघडली ती राज्यातील विरोधी पक्षाची- संजय राऊत
- ‘विरोधी पक्षाची गेल्या दोन वर्षांतील अचिव्हमेंट काय?’, संजय राऊतांचे टीकास्त्र
- ‘कितीही संकटं येवोत, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करीत राहणार’
- २४ महिन्यांतील मविआचे १०० घोटाळे, किरीट सोमय्यांनी केले उघड
- ‘या’ दोन सुपरस्टारसोबत रोहित शेट्टी करणार का काम?