मुंबईकरांसाठी पुढचे काही तास अत्यंत धोक्याचे ; समुद्रात हायटाईडचा इशारा

mumbai highted

मुंबई : हाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने राज्यात पाऊस जोर धरणार आहे. राज्यातील पाच जिल्ह्यांसाठी मंगळवारी भारतीय हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला. येत्या दोन दिवसांत या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस पडेल, असे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान आज सकाळपासूनच दक्षिण मुंबईसह पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस होतो आहे. गोरेगाव, अंधेरी, वांद्रे, परळमध्ये जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. रस्ते आणि रेल्वे वाहतूक अद्याप सुरळीत सुरु आहे. तर मुंबईला पाणीपुरवठा करणारी मिठी नदीही तुडूंब भरुन वाहत आहे. हवामान विभागाने आज मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. सायंकाळी 4 नंतर मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

येत्या काही तासात मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने ट्वीट करून तशी माहिती दिली आहे. दरम्यान, आज वसई-विरार नालासोपारा परिसरात मुसळधार पाऊस झाला असून, रस्त्यांवर 2 फुटांपर्यंत पाणी साचल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे मुंबईतील समुद्राला देखील हायटाईडचा इशारा देण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP