पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल : उद्धव ठाकरे

Uddhav-Thackeray-1

टीम महाराष्ट्र देशा- ‘धो धो पावसाची पर्वा न करता अथक मेहनत घेतलेल्या शिवसैनिकांमुळेच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांवर भगवा फडकला. इरेला पेटला की शिवसैनिक काय करतो त्याची प्रचीती देणारा हा विजय होता. ही पुढच्या निवडणुकीची रंगीत तालीम होती. यापुढे लढायचं आणि जिंकायचंच! शिवसैनिक असाच एकवटला तर पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल’ असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

मुंबई पदवीधर मतदारसंघात १९ हजार ४०३ मते मिळवून दणदणीत विजयी झालेल्या विलास पोतनीस यांचा आज वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेना नेते मनोहर जोशी, ऍड. लीलाधर डाके, खासदार संजय राऊत, गजानन कीर्तिकर, राज्यमंत्री रवींद्र वायकर, महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, आमदार व विभागप्रमुख ऍड. अनिल परब, शिवसेना सचिव सूरज चव्हाण आदी उपस्थित होते.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे ? 

धो धो पावसाची पर्वा न करता अथक मेहनत घेतलेल्या शिवसैनिकांमुळेच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांवर भगवा फडकला. इरेला पेटला की शिवसैनिक काय करतो त्याची प्रचीती देणारा हा विजय होता. ही पुढच्या निवडणुकीची रंगीत तालीम होती. यापुढे लढायचं आणि जिंकायचंच! शिवसैनिक असाच एकवटला तर पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल.हा विजय मी शिवसैनिकांना विनम्रपणे अर्पण करतो. पदवीधर आणि शिक्षकांच्या प्रश्नांना विधान परिषदेत वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून द्या’.