मुंबई : राज्यात विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. जवळपास २१० आमदारांचे मतदान पार पडले आहेत. यात महाविकास आघाडी कडून ६ तर भाजपकडून ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १० जागासाठी ११ उमेदवार रिंगणात असल्याने आता मोठी चुरस निर्माण झाली आहे. यामुळे आता दहाव्या जागी महाविकास आघाडीचा विजय होतो का ? भाजप बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे. दरम्यान याच निवडणुकीच्या पार्शभूमीवर बोलताना राज्यमंत्री व प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी एक मोठे विधान केले आहे.
येणाऱ्या काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा प्रहार संघटनेचा असेल, असे मोठे विधान बच्चू कडू यांनी केली आहे. आज विधानपरीषेदेच्या निवडणुकीत मतदान केल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी त्यांनी विधानपरिषद निवडणूक बाबतही भाष्य केले आहे. यावेळी महाविकास आघाडीला यश मिळेल असे त्यांनी सांगितले.
येणारा काळ अपक्ष आणि लहान पक्षांचाच राहणार आहे. आम्ही बोलू तसेच सरकार चालणार आहे. याचा परिणाम या निवडणुकीत दिसणार आहे. ही निवडणूक महाविकास आघाडीच्या बाजूने राहून, दुसऱ्या बाजूला फटका बसणार आहे. पुढच्या वेळेसही आमचं राज्य येणार आहे, म्हणचे प्रहारचं, असेही बच्चू कडू म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- “भाजपचा पोकळ आत्मविश्वास, दूध का दूध – पाणी का पाणी होईल” भास्कर जाधवांची टीका
- वयाच्या १४ व्या वर्षी ओम पुरी यांनी ५५ वर्षांच्या मोलकरणीसोबत ठेवले होते शारीरिक संबंध
- Legislative council election : भाजपचे आमदार आमच्या संपर्कात; जयंत पाटलांचा मोठा दावा
- विधान परिषद निवडणुक संदर्भात भाजप आमदार राम कदम यांची प्रतिक्रिया
- …तर उध्दव ठाकरे सरकारला तोंड दाखवायला जागा राहणार नाही – रामदास आठवले