पुढील १०० ते १२० दिवस महत्वाचे; कोरोना नियमांच तंतोतंत पालन करा – अजित पवार

ajit pawar

पुणे : कोरोना रोगाने गेल्यावर्षीपासून देशासह जगभरात थैमान घातला आहे. अनेक देश या रोगातून सावरत असून भारताला दुसऱ्या लाटेचा फटका बसला. कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्याहून अधिक भयंकर होती. या लाटेचे सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात दिसून आले. राज्यातील स्थिती आता आटोक्यात येत असून अद्यापही अनेक जिल्ह्यांमध्ये चिंता कायम आहे.

दरम्यान, दुसरी लाट पूर्णपणे ओसरण्याआधीच तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्यासह आरोग्य यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. याबाबत आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना महत्वाचं आवाहन करतानाच पुढील १०० ते १२० दिवस महत्वाचे असल्याचं म्हटलं आहे.

‘राज्यातील सर्वांनीच कोरोना नियमांचं पालन केलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीची पूजा केली, तीही नियमांचं पालन करुनच केली आहे. कमीत कमी लोकांमध्ये कार्यक्रम पार पाडले पाहिजेत. लग्न किंवा इतर कार्यक्रमालाही किती लोकं असली पाहिजे, हे नियम ठरवले आहेत. या नियमाबाहेर असेल, तर ते मंत्री असू द्या किंवा सर्वसामान्य, सर्वांना नियम सारखेच,’ असं अजित पवार म्हणाले.

यासोबतच, ‘ज्या नागरिकांनी लशींचे दोन्ही डोस घेतलेत, त्यांनी टप्प्याटप्प्याने बाहेर पडायला सुरुवात केली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. पण, अनेकांचं मत वेगवेगळं आहे, वैज्ञकीय क्षेत्रातील मान्यवरही वेगळं मत मांडत आहेत. काही मान्यवर असं मत माडतात की, इथून पुढे 100 ते 120 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. त्या, 120 दिवसांत आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. लोकांनी नियमांचं तंतोलन पाल करायला हवं. मात्र, ग्रामीण भागात हे नियम पाळले जात नाहीत, मी नगर जिल्ह्यातील एका गावात गेलो होतो, तेथे मला नेहमीप्रमाणे वातावरण दिसलं, कुणीही मास्क घातला नव्हता, हे निष्काळजीपणा आहे,’ अशी नाराजी देखील अजित पवार यांनी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या

IMP