शिवसेना आमदार नाराज असल्याची बातमी खोटी : एकनाथ शिंदे

eknath-shinde

टीम महाराष्ट्र देशा : ”शिवसेनेचे 17 आमदार नाराज असल्याची बातमी खोटी आहे. आमचा कोणताही आमदार नाराज नाही. सर्व आमदार पक्षासोबत आहेत.” असा खुलासा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केले आहे. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे नेते नाराज असल्याचा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. त्यावर शिंदे यांनी स्पष्टीकर दिले आहे.

महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून शिवसेनेची कोंडी झाली. त्यातच आधी मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून भाजपची साथ सोडलेली असताना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापनेच्या चर्चा अजूनही सुरूच आहे. अशातच आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे 17 आमदार नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या, यावर शिंदे यांनी खुलासा केला असून हे वृत्त चुकीचे असल्याचे सांगितले आहे.

भाजपसोबतची मैत्री तोडण्याच्या निर्णयावर शिवसेनेतील 17 आमदार नाराज असल्याचे सांगण्यात येत होते. शिवसेनेनं हिंदुत्त्वाचा मुद्दाही सोडल्याने हे आमदार नाराज असल्याचे बोलले जात होते. नाराज आमदार हे पश्चिम महाराष्ट्रातील असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. परंतु, आता या सर्व मुद्यांचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्याकडून खंडन करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :