प्रकृती ठणठणीत असून मी क्वारंटाइन असल्याचे वृत्त खोटे- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

bhagatsinh koshiyari

मुंबई: गेल्या ३ महिन्यांपासून कोरोनाने राज्याला घातलेला विळखा हा वाढतच आहे. बॉलिवूड कलाकार अमिताभ बच्चन यांच्यापासून ते अनेक राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. तर अनेक जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात येत नसल्याने पुन्हा लॉकडाऊनचा पर्याय वापरला जात आहे. तर आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे निवासस्थान असलेले राज्यभवन कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. राजभवनावर जवळपास १८ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

जगाने बघितलं, भारताने कोरोना विरोधात यशस्वी लढाई लढली – अमित शाह

तर, राजभवनातील जवळपास १८ कर्मचाऱ्यांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वतःला क्वारंटाइन करून घेतल्याचं वृत्त काही माध्यमांनी आपल्या म्हटलं होतं. त्यावर स्वतः राज्यपालांनी माहिती दिली असून, आपण स्वतःला क्वारंटाइन केलं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राज्यपालांचं निवासस्थान व कार्यालय असलेल्या राजभवनात जवळपास १८ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.

नया है वह, मंत्री बनवल्यानं शहाणपण येतंच असं नाही ना?

त्यानंतर मुंबई महापालिकेनं या कर्मचाऱ्यांच्या पुन्हा एकदा चाचण्या केल्या आहेत. तसेच राजभवनाचं सॅनिटायझेशनही करण्यात आलं आहे. दरम्यान, करोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वतःला क्वारंटाइन केल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं. ते वृत्त निराधार असल्याचं राज्यपाल कोश्यारी यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

अहो चंद्रकांतदादा… फिल्ड वर काम करणारे डॉक्टर्स, पोलीस हे काय गोट्या खेळत होते का ?

“आपली प्रकृती ठणठणीत असून आपण स्व-विलगीकरणात नाही. आपण आवश्यक टेस्ट केल्या असून त्यांचे परिणाम देखील नकारात्मक आले आहेत. करोनाची लक्षणे देखील आपल्यात दिसून आली नाहीत. आपण कार्यालयीन कर्तव्ये बजावताना मुखपट्टीचा वापर, सुरक्षित सामाजिक अंतर, आदी आवश्यक ती खबरदारी घेत आहो. आपल्या प्रकृतीसंदर्भात काही ठिकाणी येत असलेले वृत्त निराधार आहे. आपली तब्येत चांगली आहे,” असं राज्यपालांनी म्हटलं आहे.

राजभवनातील जवळपास १८ कर्मचारी करोना पॉझिटिव्ह असल्याचं वृत्त एएनआयनं दिलं होतं. राजभवनावरील १०० कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यात आतापर्यंत ५५ जणांचे अहवाल हाती आले आहे. यात १८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तर महापालिकेने राजभवनाचं तातडीने सॅनिटायझेशनही केलं आहे.