पंढरपुरात बडव्यांनी उभारले वेगळे विठ्ठल मंदिर

blank

पंढरपूर : अवघ्या महाराष्ट्रातील भाविकांचे आराध्य दैवत असणाऱ्या विठुमाऊलीच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक जात असतात. मात्र आता तुम्ही पंढरपुरात गेल्यावर तुम्हाला दोन विठ्ठल मंदिर दिसू शकतील. होय,आम्ही जे सांगत आहोत ते खरे आहे. कारण, बडव्यांनी वैयक्तिक मालकीचे स्वतंत्र विठ्ठल मंदिर उभारले आहे.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर २०१४ साली बडवे यांच्या जाचातून श्री विठ्ठल-रुक्मिणीची सुटका झाल्याची भावना विठ्ठल भक्तांमध्ये आहे. नाडकर्णी आयोगाच्या अहवालात मंदिरात असलेल्या अयोग्य गोष्टी समोर आल्या होत्या. मात्र आता या निकालानंतर पंढरपुरात बाबा बडवे यांनी आपल्या खाजगी जागेत वैयक्तिक मालकीचे विठ्ठल मंदिर उभारले आहे.