आता बांधली जाणार नवीन संसद ईमारत, टाटाला मिळाले “इतक्या कोटीत कंत्राट”

sansad

नवी दिल्लीः मागील काही वर्षांपासून भारताच्या नवीन संसदेच्या बांधणीची चर्चा सुरू होती. आता हे काम प्रत्यक्षात सुरू होणार आहे. भारतीय जनता पक्षाने सत्तेत आल्यानंतर नवीन संसदेच्या कामासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते. आता यावर निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून टाटा कंपनीला याचे कंत्राट मिळाले आहे. टाटा कंपनीने प्रारंभिक बोली जिंकली आहे. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडने बुधवारी ८६१.९० कोटी रुपये खर्चाने नवीन संसद भवन बांधण्यासाठी बोली लावलीय. तर एल अँड टी लिमिटेडने ८६५ कोटींची बोली सादर केली होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.आम्ही एल 1 बिड जिंकली आहे.

टाटाने यासाठी सुमारे ८६२ कोटी रुपये अपेक्षित खर्च सादर केला आहे. तर एल अँड टीने ८६५ कोटी खर्च सांगितला आहे. पण ही अंतिम बोली नाही, असं टाटा कंपनीने म्हटलं आहे.केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने (CPWD) आर्थिक बोली सुरू केलीय. यामध्ये टाटा प्रोजेक्ट लिमिटेडने ८६१.९० कोटी रुपयांची बोली लावली. तर लार्सन अँड टुब्रोने ८६५ कोटींची बोली लावली. टाटाची बोली कमी आहे. त्यामुळे टाटा कंपनीला नवीन संसद भवन बांधण्याचं काम मिळेल हे जवळजवळ निश्चित मानलं जातंय.

दिल्लीतील सध्याची संसद भवन इमारत खूप जुनी झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सुरक्षेसंदर्भातील धोका लक्षात घेता केंद्र सरकारने संसदेची नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सरकारने हिरवा कंदील दिला आहे.

विद्यमान इमारतीजवळ नवीन संसद भवन बांधण्यात येईल. या भवनचे बांधकाम केंद्रीय व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पांतर्गत तयार केले जाईल. नवीन संसद भवनाचे बांधकाम येत्या २१ महिन्यांत पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला जातोय. नवीन संसदेची इमारत भूखंड क्रमांक ११८ वर बांधली जाईल, असं केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागानं (CPWD) म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या :