नगरमधील राष्ट्रवादीची खेळी फडणवीसांच्या जिव्हारी; भाजपकडून कोतकरांना कारणे दाखवा नोटीस

devendra v/s pawar

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- स्थायी समितीच्या सभापती पदासाठी मनोज कोतकर यांचे नाव भाजपकडून अंतिम असल्याचे सांगण्यात येत असतानाच मनोज कोतकर यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. नंतर त्यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड देखील झाली.

अहमदनगर महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने केलेली खेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. अहमदनगर महापालिकेचे नवनिर्वाचित सभापती मनोज कोतकर यांना भाजपकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.

भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत दाखल झालेले आणि स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर यांनी कालच पदभार स्विकारला. परंतु भाजपने कोतकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, ते अधिकृत राष्ट्रवादीत राहिल्यास त्यांचे नगरसेवकपद धोक्यात येण्याची शक्यता आहे. मनोज कोतकर यांना भाजपचे शहराध्यक्ष महेंद्र गंधे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. ते कोणत्या पक्षात आहेत, हे आगामी तीन दिवसांत जाहीर करण्यास सांगून, कारवाई करण्याची तंबी नोटीशीत दिली आहे.

मनोज कोतकरांचे कृत्य हा पक्षांतरबंदी कायद्यानुसार गुन्हा आहे. त्यामुळे ते नेमक्या कोणत्या पक्षाचे सभापती आहेत, हे त्यांनी स्पष्ट करावे यासाठी तीन दिवसात उत्तर देण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया महेंद्र गंधे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :-