कोरोनानंतर भारतावर आले नैसर्गिक संकट, अतिउष्णतेमुळे राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी

temperature

नवी दिल्ली : कोरोना पाठोपाठ आता भारतावर नैसर्गिक संकट देखील आले आहे. पुढील काही दिवस देशात उष्णतेची लाट असणार असून देशवासीयांनी दुपारच्या वेळेस बाहेर जाणे टाळावे, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. येत्या दिवसात तापमान हे 45 डिग्री सेल्सिअसच्या वर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी या लाही-लाही होणाऱ्या उष्णतेपासून वाचण्यासाठी घरीचं राहावे असे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.

हवामान खात्याकडून उत्तर भारतातील राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ठिकाणच्या बर्‍याच भागात तापमान 45 डिग्री सेल्सिअसच्या वर जाऊ शकते. काही ठिकाणी तापमान 47 अंशांपेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे. आयएमडीनं रविवारी दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि राजस्थानसाठी पुढील दोन ते तीन दिवस ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.

हवामान केंद्राचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव यांनी सांगितलं की, विभागानं पूर्व उत्तर प्रदेशातही उष्मघातामुळे ऑरेंज अलर्ट दिला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत काही भागातील तापमान 47 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. उन्हाळ्याच्या हंगामात प्रथमच उष्मघातामुळे रेड अलर्ट देण्यात आला आहे.

लोकांनी दुपारी ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत घराबाहेर पडू नये म्हणून इशारा देण्यासाठी रेड अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. कारण त्यावेळी उष्णता सर्वाधिक असेल. 28 मे नंतरच उष्णतेपासून सुटका होऊ शकते. कारण पश्चिमी भागातील हवामानाच्या बदलामुळे अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

कोरोना को हाराना है ये हमारा ब्रिद, आज आई है मुस्लीम समाज की ईद : आठवलेंच्या कवितेतून शुभेच्छा

हे आहेत खरे हिरो ! मुळचे नगरचे मात्र तेलंगणात कार्यरत असलेले IPS भागवतांनी केले मोठे कार्य

… तर मग आता परप्रांतीयांना आमची परवानगी घ्यावी लागेल, CM योगींना राज ठाकरेंचा दणका !