‘समकालीन इतिहास व संशोधन पद्धती’ या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

भारत महाविद्यालय जेऊर येथे राष्ट्रीय चर्चासत्र उत्सहात संपन्न

जेऊर – भारत महाविद्यालय व सोलापूर इतिहास संशोधन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जेऊर येथे ‘समकालीन इतिहास व संशोधन पद्धती’ या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रास भरघोस प्रतिसाद मिळाला. या आंतरविद्याशाखीय चर्चासत्रांमध्ये 155 संशोधक प्राध्यापकांनी सहभाग घेतला. प्राचीन,मध्ययुगीन,आधुनिक व संशोधन पद्धती या चार विभागामध्ये 114 संशोधकांनी आपले अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादर केले.या शोधनिबंध संग्रहाचे प्रकाशनही या वेळी मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

bmj1

या चर्चासत्रांचे उद्घाटन आमदार नारायण आबा पाटील यांचे अध्यक्षतेखाली व जि.प सदस्या सौ.सवितादेवी राजेभोसले यांच्या शुभहस्ते झाले. प्रा.डाॅ सतिश कदम यांच्या बीजभाषणाने या चर्चासत्रास आरंभ झाला.या चर्चासत्रासाठी डाॅ.विश्वनाथ पवार,डाॅ. सोपान जावळे,पं.स.चे सभापती शेखर गाडे,प्राचार्य जोगी,डाॅ. राजेंद्रसिंह लोखंडे, प्रा.नामदेव गरड,डाॅ.भारत जाधव,डाॅ.विकास कदम,प्रा.मारूतीराव सावंत, डाॅ. संजय गायकवाड, डाॅ.प्रभाकर कोळेकर,धन्यकुमार दोशी आदी मान्यवर उपस्थित होते.प्राचार्य डाॅ.अनंत शिंगाडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.चर्चासत्रांचे समन्वयक प्रा. डाॅ. शिवाजी वाघमोडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डाॅ. संजय चौधरी यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.वसंत यादव यांनी आभार मानले.

You might also like
Comments
Loading...