मुंबई : निवडणुक आयोगाने शिवसेनेचं पक्षचिन्हं गोठवल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू असतानाच आता यात भाजपनेसुद्धा उडी घेतली आहे. दोन्ही गटांना धनुष्यबाण चिन्ह मिळणार नाही, असा आदेश आयोगाने दिले होते. आता ठाकरे यांच्या गटाला मशाल हे चिन्ह मिळाले. उद्धव ठाकरे गटला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव दिलं असून चिन्ह ‘मशाल’ दिलं आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’असं दिलं आहे. अशातच आता आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या नावावरून ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरेंच्या गटाला दिलेलं नाव ‘उद्धव ठाकरे बाळासाहेब सेना” हे नसून ते खऱ्या अर्थानं ‘उद्धव काँग्रेस सेना’ आहे, असा टोला आमदार रवी राणा यांनी लगावला आहे. म्हणून येणाऱ्या काळात खरी शिवसेना बाळासाहेबांची एकनाथ शिंदेंची आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या पोटनिवडणुकीतही भाजप आणि एकनाथ शिंदेंसोबतची शिवसेना विजयी होईल,असा विश्वास व्यक्त करत त्यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर असे मेसेज येत असतात. त्याला गंमतीने घ्या, असं मुनगंटीवार म्हणालेत. त्याचबरोबर रामाला विरोधा केल्याने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं चिन्ह गेलं, असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं. यावर ठाकरे गटाकडून काय उत्तर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागेलेलं आहे.
दरम्यान, काल म्हणजेच सोमवारी निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे गटांना कोणते चिन्ह आणि नाव मिळणार याविषयी निर्णय जाहीर केला. त्यामध्ये ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव दिलं असून चिन्ह ‘मशाल’ दिलं आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’असं दिलं आहे. त्याचप्रमाणे शिंदे गटाचे तिन्ही चिन्हं निवडणूक आयोगानं अमान्य केली असून पुन्हा नव्याने तीन चिन्हे सूचवा, असा आदेश आयोगाने दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shahajibapu Patil | ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव मिळाल्यावर शहाजीबापू पाटलांची उद्धव ठाकरेंवर टीका
- Sanjay Raut | निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ नाव आणि पक्षचिन्ह गोठवल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, कोर्टाबाहेरुन म्हणाले…
- Shivsena । शिवसेनेचे अस्तित्व मिटविण्याचे अधम व नीच कृत्य एकनाथ शिंदे या गारद्याने केले; शिवसेनेचे टीकास्त्र
- Anil Parab | धगधगती मशाल सगळ्यांना जाळून टाकेल, अनिल परबांचा विरोधकांना इशारा
- Shivsena । येथे महाराष्ट्राच्या गद्दारांना स्वाभिमानी मराठी जनतेने कायमचे गाडले आहे; शिवसेनेचा सामन्यातून हल्लाबोल