गायकवाड यांच्या उमेदवारीवरुन भाजपमध्ये संशयकल्लोळ तर सुधाकरराव शृंगारे यांचे नाव चर्चेत

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणूकीसाठी लातूर येथील खा.डाँ.सुनील गायकवाड यांना पुन्हा उमेदवारी देण्याबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला असून जिल्हा परिषद सदस्य सुधाकरराव शृंगारे यांचे नाव पुढे येत असल्याने भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत भाजप गोटात कमालीचे औत्सुक्य लागून राहिले आहे. लोकसभेची निवडणूक जवळ आल्याने या मतदारसंघात लोकसभेचे वारे जोरात वाहू लागले आहे.

पक्षातील एका सर्वेक्षणातून लातूर मतदारसंघावर विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर आमच्याकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी आहे. उमेदवारीचे निकष ठरविण्यासाठी स्वतंञ यंञणा आहे व त्या यंञणेमार्फत उमेदवार निश्चित केला जाईल. अनेकजण तोलामोलाचे असल्यामुळे उमेदवारी कोणाला दिली जाईल हे आताच सांगता येणार नाही,असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या लातूर दौ-यात अलीकडेच केल्याने खा.गायकवाड यांच्या उमेदवारीवरुन संशयकल्लोळ उठला आहे. खा.गायकवाड यांना उमेदवारी मिळणार की त्यांचा पत्ता कट होणार याचीच चर्चा सुरु आहे. संसदेतील हजेरी,रेल्वेच्या फे-या व रेल्वेस्थानकाचा दर्जा वाढविणे,खासदार निधीचे वाटप यासह अनेक विकासकामे ही त्यांची जमेची बाजू असली तरी संपर्काचा अभाव,निधी वाटप करताना पक्षीय कार्यकर्त्यांचा विचार न करणे व स्थानिक पातळीवरील जोरदार पक्षीय विरोध याबाबी खासदार यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Loading...

भाजपकडे गायकवाड यांच्याशिवाय वडवळ येथील जिल्हा परिषद सदस्य व मोठे कंञाटदार सुधाकरराव शृंगारे हे मागील दोन वर्षापासून खासदारकीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कामाला लागले आहेत. मतदारसंघात ते कमालीचे सक्रीय झाले असून त्यांनी आपला संपर्क वाढविल्याने त्यांचे नाव जोरदार चर्चेत आहे. एवढेच नव्हे तर राजकीय वर्तुळात अनेकजण त्यांना ‘भावी खासदारसाहेब’म्हणून संबोधतात. जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती संजय दोरवे हेही उमेदवारीच्या स्पर्धेत आहेत. दरम्यान मागील लोकसभा निवडणूकीनंतर या जिल्ह्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रत्येक निवडणूकीत भाजपाला नेञदीपक यश मिळाले आहे. या निवडणूका पालकमंञी संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्याने साहजिकच या यशाचे श्रेय आपसुकच ना.पाटील यांना जाते. या पार्श्वभूमीवर ना.पाटील यांची भूमिका या उमेदवारीबाबत अनन्यसाधारण राहणार आहे. परंतु सुरुवातीला भावा-भावा प्रमाणे राहणारे संभाजीराव व सुनीलराव या उभयतांमध्ये आज ते पूर्वीचे ‘सख्य’ पाहायला मिळत नाही तर मागील काही दिवसापासून ना.पाटील व खा.गायकवाड या उभयतांमाध्ये राजकीय ‘शीतयुध्द’ सुरु असल्याची चर्चा भाजपा गोटातून ऐकावयास येत आहे.त्यामुळे आगामी उमेदवारीबाबत ना.पाटील काय भूमिका घेणार याला महत्व आहे.ते कोणाच्या पाठीमागे आपली शक्ती लावणार त्या उमेदवाराला भाजपचे तिकीट मिळणार आहे.एकुणच विद्यमान खा.गायकवाड यांच्या उमेदवारीबाबत भाजप वर्तुळात सध्यातरी संशयकल्लोळ निर्माण झाला आहे,हे माञ निश्चित !

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर