fbpx

शिवसैनिकांकडून किरीट सोमैय्या यांच्या नावाला कडाडून विरोध

टीम महाराष्ट्र देशा: देशभरात लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे . आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात पक्ष जोरदार तयारी करत आहेत. ही तयारी करत असतानाच समविचारी पक्षांना एकत्र घेताना काहीशी तू तू मै मै होताना दिसत आहे. आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला. त्यावेळी भाजप बरोबर युती झाल्यास युतीचा उमेदवार म्हणून किरीट सोमैय्या यांना उमेदवार म्हणून घोषित केल्यास शिवसेना त्यांना मतदान करणार नाही असा विरोध शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात आला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर मुंबई लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी युती झाली तर किरीट सोमैय्या यांच्या नावाला कडाडून विरोध दर्शवला आहे.जर युतीचा उमेदवार म्हणून सोमैय्या असतील तर शिवसैनिक त्यांना मत देणार नाहीत. अस शिवसैनिकांकडून सांगण्यात आलं.

शिवसेना भाजप युतीबाबत अजूनही अनिश्चितता आहे. युती व्हावी या दृष्टीने दोन्ही पक्षांन मध्ये अद्याप कोणतीही साकारात्मक चर्चा देखील होताना दिसत नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युती होणार का ? आणि होणार असेल तर कधी असा प्रश्न निर्माण झाला आहे. पण युती होयचा आधीच शिवसेनेकडून किरीट सोमैय्या यांना विरोध दर्शवला जात आहे.