उच्चभ्रू वसाहतीमध्येही नागरी सुविधांचा अभाव

rasta prashn

औरंगाबाद : शहरातील वॉर्ड क्रमांक ८० म्हणजे वेळी-अवेळी येणारे पाणी, भयंकर खराब रस्ते, बकाल उद्याने, नियमित कर भरणारा आणि महानगरपालिकेस जास्तीत जास्त कर वसुली करून देणारा हा वॉर्ड. न्यायाधीश, वकील, अभियंते, निवृत्त अधिकारी, व्यवसायिक, उच्चभ्रू नागरिकांची वसाहत असलेला हा वॉर्ड विकासापासून कोसो दूर आहे.

वॉर्ड क्रमांक ८० अंतर्गत संपूर्ण एन-३, एन-४ सिडको, पारिजात नगर या भागांचा समावेश होतो. शिवछत्रपती महाविद्यालय, संत मीरा विद्यालय व महाविद्यालय, लॉ कॉलेज अशा अनेक मोठ्या शैक्षणिक संस्था या परिसरात आहे. येथील नागरिक नियमित कर भरतात, तरीही रस्ते अतिशय खराब अवस्थेत आहेत. आयुक्त, अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही फायदा झालेला नाही. या भागात उद्याने देखील बिकट अवस्थेत आहे. विधानसभा निवडणुकीत येथील रस्ता कामाचे उद्घाटन केले होते. मात्र आजही हा रस्ता अर्धवट अवस्थेत आहे.

१५ वर्षांपासून भाजपचे राज

मागील पाच वर्षे याठिकाणी भाजपा महिला आघाडीच्या ॲड. माधुरी अदवंत या नगरसेविका आहेत. त्याआधी भाजपचेच प्रमोद राठोड यांची सत्ता होती. गेली १५ वर्षे याठिकाणी भाजप आपला गड राखून आहे. मात्र यंदा हा खेळ पालटण्याची शक्यता आहे. कारण पाणी, रस्ते, कुठल्याही समस्या कायमस्वरूपी सुटलेल्या नाही. त्यामुळे बदल होणारच अशी चिन्हे दिसत आहेत. सध्या वॉर्ड आरक्षण सोडतीचा निर्णय न्यायालयात आहे. त्या सोडतीनुसार याठिकाणी प्रमोद राठोड उभे राहण्याची शक्यता आहे. यासाठी त्यांनी तयारी सुरू केल्याचे समजते.

यंदा बदल होणारच

गेली ८ वर्षे मी या भागात काम करत आहे. लोकांच्या अडीअडचणी जाणून घेणे, सामाजिक कामे अशी कामे करत आहे.मात्र याठिकाणी जितका विकास व्हयला हवा होता तो अजूनपर्यंत झालेला नाही. त्यामुळे मी शहर परिवर्तन आघाडीद्वारे निवडणूक लढवणार आहे. – राहुल इंगळे

जवळपास सगळीच कामे पूर्ण

संपूर्ण रस्त्यांची कामे सरकार बदलल्यामुळेच रखडले आहे. नाल्याच्या कामासाठी वॉर्ड अभियंत्याकडे अनेकदा पाठपुरावा केला. परंतु संपूर्ण नाल्यावरच स्लॅब टाकता येत नाही. जवळपास सगळीच कामे पूर्ण झालेली आहेत, काही शिल्लक आहेत. मनपावर प्रशासक राज असल्याने आमच्या हातात काहीही नाही. ५ वर्षात अनेक कामे मार्गी लावली आहेत. – माधुरी अदवंत, माजी नगरसेविका

महत्वाच्या बातम्या 

निर्णय घेण्यात राष्ट्रवादीचे नेते प्रगल्भ;आरोपांमुळे एका क्षणात उद्ध्वस्त करणे योग्य नव्हे : संजय राऊत

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ पुन्हा आले एकत्र

धनंजय मुंडेंवर माझा विश्वास – जयंत पाटील

‘एक विहारी सब पर भारी’, भाजप खासदाराच्या टीकेवर सेहवागच प्रतिउत्तर