युवकांच्या हृदयाला साद घालण्यासाठी येतोय ‘बहाना’

पुणे : आपल्या आवाजाच्या आणि आदाकारीच्या जोरावर जगाला मोहिनी घालणारी मुक्ता के. यांच्या ‘बहाना’ नवीन अल्बमचे प्रकाशन १९ मार्च २०१८ रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी पत्रकारपरिषदेमध्ये दिली.

मुक्ता या संगीत तसेच मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. पाश्चिमात्य संगीतात त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय पातळीवर आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. वयाच्या १६ वर्षी त्यांनी आपल्या सांगीतिक कारकिर्दीला सुरुवात केली. भारतीय संगीताच्या बरोबरीने रॅप या पाश्चिमात्य संगीत प्रकारात प्राविण्य मिळविले. त्यांनी रॅप या प्रकारात केलेल्या विविध सादरीकरणाला रसिक श्रोत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

संगीताच्या बरोबरीने अभिनय व मॉडेलिंग या क्षेत्रात देखील आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाल्या आहेत. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध जाहिरातीमध्ये काम करताना स्वत:ला सिद्ध केले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या “२४के गोल्ड” या अल्बमला सुमारे साडे तीन लाख हिट्स मिळाले असल्याने त्यांचा एका चाहता वर्ग निर्माण झाला आहे.

यावेळी बोताताना त्या म्हणाल्या की, नृत्यातील हिपहॉप या प्रकाराला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचविण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. बहाना या अल्बममध्ये हिपहॉप हा प्रकार वेगळ्या प्रकारे सादर करण्यात येणार आहे, जो नक्कीच आपणा सर्वांना आवडेल.