मुरुड ते येडशी महामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा

blank

टीम महाराष्ट्र देशा : टेभूर्णी ते लातूर या महामार्गावर येडशी ते मुरुड या ३५ किमीच्या रस्त्यावर मोठमोठे खडे पडल्याने अपघात वाढले आहेत तसेच या महामार्गावर चोर्याचे प्रमाण वाढले आहेत त्यामुळे महामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे.

या महामार्गावर अनेकांची बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत, येडशी, कसबे, तडवळे , ढोकी व पुढे मुरुड पर्यंत यामहामार्गावर सबंधित विभागाच्या अधिकार्याचे दुर्लक्ष असल्यामुळे प्रवाशामधून तिव्र संताप व्यक्त होत आहे. या महामार्गावर वाहनाची जास्त वाहतूक असते मागील काही दिवसापूर्वी चोरीच्या मोठया घटना ही घडल्या होत्या जसे काहीदिवसापुर्वी दुधगाव ते एरंडवाडीच्या दरम्यान लग्नकार्यासाठी खासगी ट्रेवल्समधून निघालेल्या वऱ्हाडी मंडळीवर चोरट्यांनी हल्ला केला प्रवाशांना लुटले होते, यामुळे वाहनचालक आणि प्रवासी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रस्त्याची चाळणी झाल्यामुळे वाहतूकदारास जीवमुठीत घेऊन वहान चालवत आहे खडे चुकवण्याच्या प्रयन्तात बरेच बळी गेली आहेत पण शासन आणि प्रशासनाचे मात्र याकडे पूर्णतः हा दुर्लक्ष दिसून येत आहे हा मनस्ताप किती वर्ष भोगावा लागेल असा प्रश्न मात्र प्रवाशांना पडला आहे.

महत्वाच्या बातम्या