मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा होणार, विद्यार्थी उशीरा आल्यास हरकत नाही

मुंबई  : महाराष्ट्रामध्ये बंदची हाक असली तरी देखील मुंबई विद्यापीठाच्या परिक्षा होणार असून विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी उशीरा येण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्यभरात वाहनांची तोडफोड, जाळपोळ होत असतांना देखील मुंबई विद्यापीठाने परीक्षा रद्द न करण्यात निर्णय घेतला आहे.

शहरात अनेक भागात वाहतूक कोंडी आणि ‘रास्ता रोको’ पाहता विद्यापीठाने परीक्षार्थींना एक तास उशिरा येण्याची मुभा दिली आहे. विद्यापीठात आज एकूण १३ अभ्यासक्रमाच्या परीक्षा आहेत. काही परीक्षा दुपारी तीन वाजता ठेवण्यात आल्या आहेत.

मात्र स्थिती अधिक चिघळली तर आज दुपारी घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आहे.

Comments
Loading...