धुळ्यातील गुंड गुड्ड्याच्या हत्येचा तपास आता मुंबई क्राइम ब्रांचकडे

धुळे :- कुख्यात गुंड गुड्ड्या ऊर्फ रफीयोद्दीन शफीयोद्दीन शेखच्या हत्या प्रकरणाचा तपास मुंबई क्राइम ब्रांचकडे देण्यात आला आहे. टोळी युद्धातून झालेल्या या हत्येचा तपास यापुढे मुंबई क्राईम ब्रांच करणार आहे. १८ जुलैला भररस्त्यात गुड्ड्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सहा मुख्य आरोपींसह आतापर्यंत १६ जणांना धुळे पोलिसांनी अटक केली आहे. मात्र अजूनही तीन मुख्य आरोपी मोकाटच आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण?
कुख्यात गुंड गुड्ड्याची 18 जुलैला भर चौकात हत्या करण्यात आली होती. या हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला होता. याप्रकरणी गोयर आणि देवरे गटातील 11 जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुड्ड्यावर धुळ्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होते. काही दिवसांपूर्वीच गुड्ड्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. पण 18 जुलैला पहाटे त्याची भररस्त्यात हत्या करण्यात आली.दरम्यान, हत्या प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्या व्यक्तींना १० ते ५० हजारापर्यंतचे बक्षीस धुळे पोलिसांनी जाहीर केलं आहे.

You might also like
Comments
Loading...