‘मल्टि कॅमेरा शूट होऊ शकलं नाही, लेपल माईक देखील राहून गेला; देशवासीयांनो सॉरी’

‘मल्टि कॅमेरा शूट होऊ शकलं नाही, लेपल माईक देखील राहून गेला; देशवासीयांनो सॉरी’

modi

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत. ते सध्या ट्विटरवर जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या नेत्यांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळेच मोदी जेव्हा एखादा फोटो पोस्ट करतात तेव्हा त्याची चर्चा देशातच नाही तर जगभरामध्ये होत असते.

नुकताच त्यांचा अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान विमानप्रवास करतानाचा फोटो देखील प्रचंड लोकप्रिय झाला होता. अशातच मोदींनी अमेरिकेच्या दौऱ्यावरुन परत येताच रविवारी सेंट्रल व्हिस्टा या भारताच्या नवीन संसदेच्या बांधकामाची अचानक पाहणी केली. मोदींनी कोणतीही पूर्वसूचना न देता हा पाहणी दौरा केल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

आता या दौऱ्याचे फोटो आणि व्हिडीओ माध्यमांमध्ये प्रसिध्द झाले आहेत. दरम्यान मोदींच्या या भेटीचं एकीकडे कौतुक होत असतानाच यावर विरोधकांनी खिल्ली देखील उडवली जात आहे. चित्रपट निर्माते विनोद कापरी यांनी देखील पंतप्रधान मोदींचा एक व्हिडीओ ट्विट केलाय. या व्हिडीओत मोदी सेंट्रल व्हिस्टा बांधकाम परिसरात दिसत आहेत. या ट्विटमध्ये विनोद कापरी यांनी म्हटलं, ‘कोणतीही पूर्वसूचना न देता भेट दिल्यानं मल्टि कॅमेरा शूट होऊ शकलं नाही आणि लेपल माईक देखील राहून गेला. देशवासीयांनो सॉरी.’ असे ट्वीट करून त्यांनी खिल्ली उडवली आहे.

तर खासदार असुदुद्दीन औवेसींनी साईटवरील भेटीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. ‘खासदार असुदुद्दीन औवेसी यांनी, संसद हे पंतप्रधान कार्यालयाचे डोमेन नाही. लोकसभा अध्यक्षांशिवाय हे येथे आलेच कसे? लोकसभा अध्यक्षांनी मोदींना परवानगी दिली होती का? असा प्रश्न औवेसी यांनी विचारला आहे. तसेच, संविधानाने बहाल केलेल्या अधिकारांच्या तत्वांचे हे उल्लंघन आहे,’ असेही औवेसी यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या