fbpx

मोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या : शरद पवार

पुणे : मोदी यांनी फक्त फसव्या घोषणा केल्या आहेत. त्यांनी कधीच आश्वसनाची पूर्ती केली नाही, असा हल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला. जनतेने अनेक मोठ मोठ्या राजवटी उलथून टाकल्या आहेत, हे सरकारने लक्षात ठेवावे असा इशाराही त्यांनी पंतप्रधानांना दिला. सासवड येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

शरद पवार मेळाव्यात बोलताना म्हणाले की, पंतप्रधान असो वा लोकप्रतिनीधी तो पक्षाचा नसतो, देशाचा असतो राष्ट्राचा विचार करायचा असतो. लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी संधी दिली तर संधीच सोनं करा आणि लोकांशी सोन्यासारखे वागा. आजचे पंतप्रधान परदेशात जाऊन पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी ना शिव्या घालतात हे देश हिताचे नाही.

मोदींचा देशाने प्रधानमंत्री म्हणून सन्मान केला आहे, मात्र सन्मानाला पात्र नाही म्हणून टीका झाली तर ते म्हणतात चहा वाल्याला संपवायला निघाले आहेत. तुम्हाला कोण संपवायला निघालेले नाही, जनताच तुम्हाला बाजूला करणार आहे, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.