आज अखेर बहुप्रतीक्षित ‘मेड इन इंडिया’ FAU-G गेम लाँच !

FAU-G-गेम

मुंबई : एनकोअर गेम डेवलपर्स (FAU-G) गेम लाँच तारखेची घोषणा केली होती. हि गेम एका खास प्रसंगी लाँच केली जाईल अशी माहिती देण्यात आली होती. आज अखेर हा बहुप्रतीक्षित गेम लाँच झाला आहे. यानंतरच अँड्रॉइड वापरकर्ते गुगल प्ले स्टोअर वरून हि गेम डाउनलोड करू शकतील. देसी पब्जी गेम म्हणजे FAU-G (Fearless And United: Guards) भारतात लाँच झाला आहे. गेल्या वर्षी अभिनेता अक्षय कुमारने FAU-G या स्पेशल गेमविषयी माहिती दिली होती.

हा गेम आजपासून प्ले-स्टोअरवर उपलब्ध झाला असून हा गेम अँड्रॉइड युजर्स तिथून डाउनलोड करु शकतात. भारत-चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर लोकप्रिय ऑनलाइन बॅटल रॉयल गेम PUBG भारतात बॅन झाल्यानंतर FAU-G गेमची घोषणा करण्यात आली होती. हा गेम आता अखेर उपलब्ध झाला आहे. हा गेम nCore गेमिंग नावाच्या एका भारतीय कंपनीने डेव्हलप केला असून गेमला अभिनेता अक्षय कुमार प्रमोट करत आहे. ट्विटरद्वारे FAU-G लाँच झाल्याची माहिती अक्षयने देखील दिली आहे.

भारत-चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावर आधारित FAU-G गेमच्या पहिल्या टीझरवनरुन हा गेम असेल हे समोर आले होते . पण, आता पूर्ण गेम-प्ले भारतीय सैन्याशीच निगडीत असेल हे स्पष्ट झाले आहे. FAU-G कमांडो गेममधील खेळाडूंना म्हटले जाईल, ही तुकडी धोकादायक क्षेत्रांमध्ये गस्त घालणाऱ्या सैनिकांची असेल.

नोव्हेंबर 2020 च्या शेवटच्या आठवड्यात गुगल प्ले स्टोअरवर या गेमचे प्री-रजिस्ट्रेशन सुरु झाले होते. प्री-रजिस्ट्रेशन च्या पहिल्या २४ तासातच कोट्यावधी लोकांनी यावर नोंदणी केली. तसेच आता या लाँचच्या बातमीनंतर आता चाहते या गेमची आतुरतेने वाट पाहत होते. आता ही प्रतीक्षा संपली आहे.

महत्वाच्या बातम्या