जोपर्यंत पेट्रोल-डिझेल- गॅस सिलेंडरचे भाव कमी होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही- नवाब मलिक

मुंबई – सरकारच्या धोरणाविरोधात आपण हे आंदोलन पुकारले आहे. जोपर्यंत पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरचे दर कमी होत नाही तोपर्यंत राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन थांबणार नाही असा इशारा यावेळी नवाब मलिक यांनी दिला.

Loading...

केंद्रसरकारच्या माध्यमातून खुलासा करण्यात येत आहे की,जगात क्रुड ऑईलचे भाव वाढले असतानाही आम्हाला भाव वाढवता येते परंतु सरकार लोकांची कुठेतरी दिशाभूल करते आहे. जगातील ८० डॉलर पर बॅरल या भावाने आपण हिशोब केला तर ३५ रुपये प्रतिलिटर पेट्रोलला आंतरराष्ट्रीय भाव मिळतो. मग इतर पैसे कुठे जातात. ३३ रुपये असेच येतात मग ५२ रुपये कुठे जातात तर ५२ रुपये केंद्र आणि राज्यसरकारच्या तिजोरीत जात आहेत. जवळपास १८ रुपये केंद्रसरकार एक्साईज डयुटीच्या माध्यमातून कसे गोळा करत आहेत. त्यानंतर जवळपास ४० रुपये या राज्यसरकारच्या तिजोरीत जातात. वेगवेगळे कर लावत आहेत. दुष्काळी कराच्या नावाने दुष्काळ दुर होत नाहीय. शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीय. २०१७ सालापासून सेस सुरु आहे. केंद्रसरकारने नाही तर सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला होता की, हायवेपासून ५०० मीटरवर दारु दुकाने चालवता येणार नाही. मग सरकारने सांगितले की आमचा महसुल बुडणार आहे. त्याच्या नावाखाली एक टक्का सेस पेट्रोल-डिझेलवर लावला. नंतरच्या काळात तो निर्णय बदलला आणि सरकारने नंतर तिकडचापण आणि इकडचापण पैसा गोळा करायचा असा उदयोग चालू ठेवला आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

भाव वाढत असताना आपल्या काळात ७० रुपये भाव असतानाही भाव वाढवले नाही. केंद्रात आमचे सरकार असताना १२० डॉलरमध्ये प्रति बॅरल भाव असताना सरकारने ५० हजार कोटी रुपये दिलासा देण्यासाठी सरकारच्या तिजोरीतून उपलब्ध करुन दिले. पण मोदी सरकार आल्यानंतर जगात २० डॉलरपर्यंत भाव गेले. चार वर्षात जवळपास साडे नऊ लाख कोटी रुपये मोदी सरकारने तिजोरीतून पेट्रोल आणि डिझेलवर कर लावून जमा केले आहे. आता सरकारला दबाव निर्माण करण्यासाठी आंदोलन सुरु आहे.

एक देश एक कर अशा गप्पा मारुन जीएसटीची घोषणा करण्यात आली होती.परंतु काय झाले याचे चित्र सर्वांना पाहायला मिळत आहे. आज राष्ट्रवादीच्या या आंदोलनामुळे नक्कीच लोक पेटून उठतील आणि लोक पेटून उठले तर सरकारला हे दर कमी करावेच लागतील असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

3 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...