राज्यसरकारच्या अध्यादेश काढण्याच्या निर्णयानंतरही मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच

टीम महाराष्ट्र देशा : वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा आरक्षणाचा तिढा राज्य सरकारच्या अध्यादेशानंतर देखील कायम असल्याच दिसत आहे. कारण १६ टक्के आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारकडून मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर प्रवेश निश्चितीचे निर्देश जोपर्यंत दिले जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याच मराठा विद्यार्थ्यांनी सांगितल आहे.

मराठा समाजातील वैद्यकीय अभ्यासक्रमातील विद्यार्थ्याना प्रवेश प्रक्रीयेमध्ये १६% आरक्षण मिळावे अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे. यावर राज्य सरकारने अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र सरकारने घेतलेल्या या निर्णयांवर मराठा समाजाचे विद्यार्थी हे समाधानी नाहीत. कारण आम्हाला ज्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे आणि जो अभ्यासक्रम मिळाला आहे, तोच मिळायला हवा, या मागणीवर मराठा विद्यार्थी ठाम आहेत. जोपर्यंत प्रवेश निश्चित झाल्याची सूचना किंवा निर्देश सीईटी कक्ष किंवा वैद्यकीय संचलनालयाच्या संकेतस्थळावर दिले जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे डॉ. आरती मोरे या आंदोलक विद्यार्थिनीने सांगितले.

Loading...

दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या यंदाच्या शैक्षणिक सत्रात मराठा आरक्षण लागू होणार नसल्याचा निर्णय देण्यात आला आहे. या संदर्भात डॉ. आदिती गुप्ता, डॉ. अनुज लद्दड, डॉ. रशिका सराफ यांच्यासह इतर उमेदवारांनी नागपूर खंडपीठाकडे मराठा आरक्षण लागू करण्यावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती.

एसईबीसी कायद्याच्या कलम १६ (२) मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, जर एखाद्या कोर्सची प्रवेश प्रक्रिया कायदा लागू होण्यापूर्वी सुरू झालेली असेल तर आरक्षण लागू होणार नाही. त्यामुळे यंदाच्या मेडिकल पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिये वेळी मराठा आरक्षण ग्राह्य धरले जाणार नाही. कारण मेडिकल पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेची सुरवात ही ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू झाली, तर एसईबीसी कायदा नोव्हेंबर २०१८ मध्ये लागू झाला. म्हणून कायद्यातील आरक्षण हे पूर्वलक्षीप्रभावाने लागू होऊ शकत नाही.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत