उंदीर यांच्या डोक्यात; एकनाथ खडसेंंसमोरच मुनगंटीवरांचा टोला

मुंबई: उंदीर मंत्रालयात नाही, तर यांच्या डोक्यात असल्याचा टोला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला लगावला. मात्र उंदीर घोटाळा बाहेर काढून भाजपला घरचा आहेर देणारे भाजप नेते एकनाथ खडसे हे देखील उपस्थित होते. त्यामुळे सुधीर मुनगंटीवरांनी नेमका टोला कोणाला मारला अशी चर्चा रंगली आहे.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, काँग्रेसने गोड बोलून शेतकऱ्यांना फसवलं. आता काँग्रेस विसर्जित केली पाहिजे. काँग्रेसला देश प्राप्त करण्याची इच्छा असून काँग्रेस म्हणजे कौरव सेना आहे. आत ही कौरव सेना एकत्र येत आहे अशी जहरी टीका अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे भाजपच्या स्थापना दिवशी मुंबईत आयोजित केलेल्या महामेळाव्यात ते बोलत होते.

उंदीर मंत्रालयात नाही यांच्या डोक्यात आहे असे ते म्हणाले. एकनाथ खडसेही मंचावर उपस्थित आहेत. एकनाथ खडसेंनीच उंदीर घोटाळा झाल्याचा आरोप करत स्वपक्षाला अडचणीत आणले होते. सत्ता मिळवण्यासाठी जाती-जातीमध्ये विष कालवल जातय अये मुनगंटीवार म्हणाले. स्थापना दिनानिमित्त वांद्रे-कुर्ला संकुलातल्या महामेळाव्यात भाजपानं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. या महामेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, प्रकाश मेहतांसह दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती.