मुंबई : नुकतेच राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) पार पडले. या अधिवेशनात विरोधकांनी उपस्थित केलेल्या सर्वच प्रश्नांना अजित पवारांनी (Ajit Pawar) सविस्तर उत्तरे दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackrey) मानेच्या आजारामुळे अनुपस्थित होते. त्यांच्या गैरहजेरीत मुख्यमंत्र्यांची जबाबदारीही अजित पवार यांनी पार पाडली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) यांनी अजित पवार यांचे कौतुक केले आहे.
अधिवेशनात सर्वात प्रभावी नेता, लोक म्हणतात फक्त दादा, अजित पवार यांना 42 टक्के सर्वाधिक लोकांची पसंती !@AjitPawarSpeaks | @NCPspeaks | #WinterSession2021
— Rupalipatilthombare (@Rupalispeak) December 29, 2021
याबाबत रुपाली पाटील ठोंबरे ट्विट करत म्हणाल्या, ‘अधिवेशनात सर्वात प्रभावी नेता, लोक म्हणतात फक्त दादा, अजित पवार यांना ४२ टक्के सर्वाधिक लोकांची पसंती!’, असे ट्विट रुपाली पाटील ठोंबरे यांनी केले आहे.
राज्याचे विधिमंडळ हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत पार पडले. या अधिवेशनात विरोधकांनी विविध प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) घेरण्याचा प्रयत्न केला होता. या प्रश्नांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियम २९३ अन्वये उपस्थित करण्यात आलेल्या चर्चेला आपल्या आक्रमक शैलित उत्तरे दिली.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकरी मदत, वीज बिल, एसटी कर्मचारी आंदोलन, विदर्भ मराठवाडा निधीवाटप, मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प आदीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्येक प्रश्नाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर देत विरोधकांना नरमाईची भूमिका घेण्यास भाग पाडले होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘भ्रष्टाचाराच्या दृष्टीने विद्यापीठ कायदा दुरुस्ती विधेयक मंजूर केले’, भाजपचा आरोप
- ‘कुणावर हल्ला घडवून आणण्याची वृत्ती वाळव्याच्या पाटलांची नाही’, राऊतांकडून जयंत पाटलांची पाठराखण
- “भाजप पुढाऱ्यांच्या डोक्याचा केमिकल लोचा”, संजय राऊतांची खोचक टीका
- “विरोधी पक्ष मांजरीचा वंशज असल्याने…” ; शिवसेनेची खोचक टीका
- ‘श्रीधर नाईकापासून, रमेश गोवेकरांपर्यंत ज्या हत्या झाल्या त्याच मालिकेत संतोष परबांनाही बसवायचे होते’