fbpx

“CSAT बाबत अत्यंत महत्वाची घोषणा”

टीम महाराष्ट्र देशा : राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका क्र.2 CSAT (सामान्य अध्ययन) हा विषय qualifying करावा या संदर्भात नेमलेल्या तज्ञ समितीच्या निर्णयाबाबत एक महत्वपूर्ण घोषणा आयोगातर्फे अखेरीस करण्यात आली आहे.
यूपीएससीच्या धर्तीवर बदललेल्या एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत CSAT या पेपरचा २०१३ पासून समावेश करण्यात आला. मात्र, यूपीएससी परीक्षेत पूर्व परीक्षा पेपर २ म्हणजेच CSAT चे गुण फक्त qualifying चे आहेत. पूर्व परीक्षा पास करण्यासाठी मेरिटच्या गुणांमध्ये CSAT चे गुण ग्राह्य धरले जात नाहीत. एमपीएससी परीक्षेसाठी मात्र राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर एक व पूर्व परीक्षा पेपर दोन म्हणजेच CSAT चे गुण ग्राह्य धरले जातात आणि म्हणूनच एमपीएससी पूर्व परीक्षेत CSAT ला जास्त महत्त्व आहे. जर चांगला सर्व केला तर हा विषय अत्यंत सोपा व स्कोअरिंग आहे. CSAT क्वालिफाईंग व्हावा अशी विशेषतः कला, कृषी शाखांच्या विद्यार्थ्यांची मागणी होती. कारण वरील विषयात अभियांत्रिकी तसेच गणिताचे बाजी मारत असल्याने पूर्व परीक्षा निघणे हे आव्हान त्यांच्यासाठी तुलनेने सोपे होत असे व इतर शाखांमधील मुलांचे CSAT मधील स्कोअर तुलनेने कमी लागत असत.मात्र अखेरीस आयोगाने समितीने दिलेल्या सखोल विश्लेषणाच्या आधारे सर्वतोपरी विचार करून परीक्षेचा पॅटर्न तसाच राहील हा निर्णय घेतला आहे. म्हणूनच CSAT सध्या तरी क्वालिफाईंग होणार नाही.

CSAT म्हणजे काय?

Civil Services Aptitude Test यालाच मराठीत नागरी सेवा नैसर्गिक क्षमता किंवा कौशल्य चाचणी असे म्हणता येईल. आयोगाच्या अभ्यासक्रमात या विषयाचा किंवा पेपरचा उल्लेख राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर क्र. दोन असा केला आहे. या पेपरला किंवा विषयाला सामान्यपणे आपण CSAT चा पेपर म्हणतो. आता आपण CSAT याचा शब्दश: अर्थ घेतला, तर नैस‌र्गिक क्षमता किंवा कौशल्य चाचणी. कशाच्या आधारे घेतली जाईल? तर त्यासाठी उत्तर दिलेले असेल, ते उत्तर वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सोडवणे; तसेच बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणिताच्या आधारे दिलेले प्रश्न किती लवकर सोडविता येईल, हे तपासणे आणि दिलेल्या एखाद्या परिस्थितीच्या आधारे आपली निर्णय क्षमता आणि निर्णय प्रक्रिया याची चाचणी बघणे म्हणजेच CSAT होय.