भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात दाखल झाले सर्वात खतरनाक हॅलीकॉप्टर

टीम महाराष्ट्र देशा- भारताच्या हवाई दलात सर्वात शक्तिशाली अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरचा समावेश झाला आहे. अपाचे हेलिकॉप्टर अमेरिकेत बनविण्यात आले आहे. भारताने अमेरिकेसोबत २२  हेलिकॉप्टरचा करार केला होता. भारताने अमेरिकेशी अशा २२ लढाऊ हॅलीकॉप्टरचा करार केला आहे.

भारतीय वायुसेनेकडे सध्या असलेले हॅलीकॉप्टर्स हे तीन दशकाहुनही अधिक जुने आहेत. अपाचे च्या एन्ट्रीने भारतीय वायुसेनेची ताकद वाढली आहे.अॅरीझोनामध्ये अपाची हेलिकॉप्टरचे उत्पादन केंद्र आहे. अपाची हेलिकॉप्टरची जगातील सर्वोत्तम लढाऊ हेलिकॉप्टर्समध्ये गणना होते. या हेलिकॉप्टरमुळे भारतीय हवाई दलाची क्षमता कैकपटीने वाढणार आहे. हवाई दलाच्या पठाणकोट तसेच आसामच्या जोरहाटमध्ये या हेलिकॉप्टर्सचा तळ असेल.

अपाचे हे जगातील सर्वोत्तम हल्ला हॅलीकॉप्टर्समध्ये मोजले जाते. रॉकेट, टॅंकवर निशाणा साधणारे मिसाइल आणि जमिनीवरील विरोधकावर हल्ला करण्यास सक्षम असते. यामध्ये दोन क्रू मेंबर असतात. तसेच हे कोणत्याही हवामानात हल्ला करु शकते.