जगात सर्वात सभ्य आणि सहिष्णू हिंदूच-जावेद अख्तर

javed akhtar

नवी-दिल्ली : भाजपा-आरएसएसवरील वक्तव्यामुळे झालेल्या वादानंतर प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जावेद यांनी तालिबानचे समर्थन करणाऱ्यांवर केलेल्या टीकांमुळे काही दिवसांपूर्वी चांगलाच वाद पेटला होता. त्यावेळी जावेद यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणारे देखील तालिबानी विचारसरणीचे असल्याचे वक्तव्य केले होते.

यासंदर्भात स्पष्टीकरण देत असतांना जावेद अख्तर म्हणाले की,’मी जेव्हा ‘एनडीटीव्ही’ वाहिनीला मुलाखत दिली तेव्हा मला अजिबात कल्पना नव्हती की, या मुलाखतीचे रूपांतर वादात होतील. एका बाजूला असे काही लोक आहेत ज्यांनी शक्य तितक्या तीव्र भाषेत त्यांचा निषेध आणि संताप व्यक्त केला आहे, तर दुसरीकडे देशाच्या कानाकोपऱ्यातील असे अनेक लोक आहेत ज्यांनी मला समर्थनाचे संदेश पाठवले आहेत आणि माझ्या मताशी त्यांची सहमती व्यक्त केली आहे. मी त्या सर्वांचे नक्कीच आभार मानीन, पण सर्वप्रथम मला माझ्या उपरोल्लेखित मुलाखतीचा तिरस्कार करणाऱ्यांच्या आरोपांना आणि टीकेला उत्तर द्यायचे आहे. प्रत्येक टीकाकाराला वैयक्तिकरीत्या उत्तर देणे शक्य नसल्यामुळे हे माझे जाहीर उत्तर आहे.’असेही ते म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’हिंदू हे जगातील सर्वात सभ्य आणि सहिष्णू बहुसंख्याक आहेत, याचा मी अनेक वेळा पुनरुच्चार केला आहे आणि हे देखील ठामपणे बोललो आहे की, हिंदुस्थान कधीही अफगाणिस्तान होऊ शकत नाही. कारण हिंदुस्थानी हे निसर्गतः कट्टरवादी नाहीत. नेमस्त असणे, मध्यममार्गी भूमिका घेणे हे त्यांच्या डीएनएमध्ये आहे.’असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या