राजभवनातील मशीद नमाजासाठी उघडा; राज्यपाल कोश्यारी यांना पत्र लिहून विनंती

कोश्यारी

मुंबई : कोरोना संसर्गामुळे मार्च पासून राज्यातील मंदिरे बंद होती. राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू असली तरी राज्यातील मंदिरे मात्र उघडण्यास परवानगी देण्यात आली नव्हती.

परंतु दिवाळीच्या पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळे उघडण्यात आली आहे.  राज्यात धार्मिकस्थळं उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे रजा अकादमीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक पत्रं लिहून राजभवनातील मशीद नमाजासाठी उघडण्याची विनंती केली आहे.

‘हिंदुस्थान टाइम्स’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. मात्र, राजभवनातून याबाबतच्या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजभवनमध्ये मशीद नाही. मात्र, मुस्लिम कर्मचाऱ्यांना नमाज पठण करता यावं म्हणून स्टाफ क्वार्टरमधील एक रुम उघडी करून देण्यात आली होती. त्यामुळे इतर सामान्य लोकही या ठिकाणी नमाज पठण करण्यासाठी येत होते. त्यामुळे या ठिकाणी हळूहळू गर्दी वाढायला लागली होती. परंतु, कोरोनाच्या काळात सर्वसामान्य जनतेला आत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती, असं सूत्रांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या