मुंबई : शेतकरी बांधव बऱ्याच दिवसांपासून मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहेत. मान्सूनने पहिल्यांदा केरळमध्ये २९ मे ला हजेरी लावली होती. दरवर्षी केरळमध्ये मान्सूनचे १ जूनला आगमन होते पण या वर्षी मान्सून हा वेळेआधीच केरळ मध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून लवकर पडेल असा हवामान विभागाचा अंदाज होता.
यावर्षी वेळेआधी तर नाही पण वेळेत देखील मान्सूनने हजेरी लावलेली नाही. मान्सून दरवर्षी महाराष्ट्रातील तळकोकणात ७ जूनला येत असतो. आणि नंतर पुढे मान्सूनचा प्रवास हा संपूर्ण राज्यात सुरु होतो. पण यावर्षी ७ जूनला मान्सून दाखल झालेला नाही. पण हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या २ दिवसात मान्सून बरसणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवाना खरीप हंगाम पेरणीचे नियोजन करता येणार आहे.
माहितीनुसार, पुढील 48 तासांमध्ये अरबी समुद्राच्या काही भागात, गोवा, दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटक काही भाग, तेलंगणाचा उरलेला भाग, दक्षिण आंध्र प्रदेशचा काही भागा यामध्ये काही भागात मान्सून परिस्थिती अनुकूल आहे. राज्यात मान्सून दोन दिवसात दाखल होण्याचे स्पष्ट झाले आहे.
महत्वाच्या बातम्या :