राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू

पुणे: नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) रविवारी संपूर्ण उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश, गुजरातचा काही भाग, छत्तीसगड, झारखंड आणि बिहार राज्याच्या काही भागांतून माघारी परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. तसेच राज्यातील उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांतून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे.

मान्सून पावसाची राज्यातील उत्तर सीमा नाशिक, जळगाव, नागपूर येथे असून पुढील २ ते ३ दिवसांत पुणे, मुंबई, कोल्हापूरसह संपूर्ण राज्यातून मान्सून परतण्यास वातावरण अनुकूल झाल्याची माहिती हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली.राज्याच्या काही भागांतून मान्सून परतला असला तरीदेखील कोकण, मध्य महाराष्ट्रात परतीच्या पावसाची हजेरी कायम होती. गेल्या २४ तासांत सांगली ३० मि.मी, सातारा २० मि.मी, कोल्हापूर १० मि.मी, वेंगुर्ला १० मि.मी, औरंगाबाद १० मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे

You might also like
Comments
Loading...