बँकिंग क्षेत्रात नोकरी करुन मिळालेला पैसा ‘अनैतिक’ ; दारुल उलूमचा फतवा

मुस्लिमांनी बँक कर्मचाऱ्यांच्या घरात लग्न करु नये

मुंबई : मुस्लीम कुटुंबाने आपल्या मुलाचं व मुलीचं लग्न बँकिंग क्षेत्रात नोकरी करणाऱ्या कोणत्याही कुटुंबात लावू नये. बँकिंग क्षेत्रात नोकरी करुन मिळालेला पैसा अनैतिक असल्याचा अजब दावा ‘दारुल उलूमने’ केला आहे.
इस्लाम धर्मात अनैतिक व्यवसायात गुंतवणूक करणंही चुकीचे असून इस्लाम धर्मातील कायदे किंवा शरीयतनुसार व्याजावर पैसे देणं आणि घेणं अनैतिक आहे त्यामुळे मुस्लिमांनी बँक कर्मचाऱ्यांच्या घरात लग्न करु नये, असा दारुल उलूमने अजब फतवा काढला आहे. इस्लाम धर्मात गुंतवणुकीतून दुसऱ्यांच्या मेहनतीवर लाभ मिळवणं चूक मानलं जातं. तसेच जगातील काही देशांमध्ये इस्लामी बँका व्याजमुक्त बँकिंगच्या सिद्धांतावर काम करतात. संपूर्ण बँकिंग व्यवस्थाच व्याजावर अवलंबून असल्यामुळे हा फतवा काढल्याचे दारुल उलूमने सपष्ट केले आहे.