‘ज्या क्षणी अनिल देशमुख ‘अज्ञातवास’ मधून बाहेर येतील, सीबीआय आणि ईडी त्याला अटक करतील’

Kirit Somaiya

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली अटक पूर्व जामीनाची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे अज्ञातवासात गेले अनिल देशमुख बाहेर येताच त्यांना अटक होईल, अशी खात्री असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

या संदर्भात किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनिल देशमुख यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘अनिल देशमुख यांना ‘प्रोटेक्शन फ्रॉम अॅरेस्ट’ देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. मला खात्री आहे की ज्या क्षणी अनिल देशमुख ‘अज्ञातवास’ मधून बाहेर येतील, सीबीआय आणि ईडी त्याला अटक करतील. हायकोर्टने देशमुख यांची याचिका यापूर्वीच फेटाळली आहे.’

मुंबई पोलीस आयुक्तांनी आरोप केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने अनिल देशमुख यांची चौकशी करण्यात येत आहे. त्यानुसार ईडी आणि सीबीआयने देशमुख यांच्या घर आणि कार्यालयांवर अनेकदा छापे देखील टाकले आहे. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयानेही दिलासा दिला नसल्याचे देशमुख यांच्या अडचणीमध्ये जास्त वाढ झाली आहे. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होणार असल्याचा दावा भाजपच्या वतीने करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या