मोदी सरकारचा 1 फेब्रुवारीला शेवटचा अर्थसंकल्प होणार सादर

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २१ जानेवारीपासून सुरु होणार असून १३ फेब्रुवारीला संपणार आहे. त्याबाबत अधीकृत घोषणा करण्यात आली आहे.  देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली हे १ फेब्रुवारीला मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती मिळते आहे.

आज झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या संसदीय समितीच्या बैठकीत या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख ठरविण्यात आली आहे. लोकसभेचे हे शेवटचे अधिवेशन असणार आहे. यानंतर एप्रिल किंवा मे महिन्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सरकार संसदेत आपला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे.

नरेंद्र मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प महत्वाचा आहे. कारण, अर्थसंकल्पावरच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीची गणिते ठरणार आहेत. त्यामुळे मोदी सरकार सर्व बाबी डोळ्यासमोर ठेउनच हा शेवटचा अर्थसंकल्प सदर करणार आहे. यामध्ये सर्वसामन्य लोकांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.

You might also like
Comments
Loading...