कोल्हापूरच्या `त्या’ विद्यार्थिनीची मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

मुंबई : गृहपाठ केला नाही म्हणून ५०० उठाबशा काढणारी विद्यार्थीनी विजया निवृत्ती चौगुले हिची काल परळच्या केईएम रुग्णालयात जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागअध्यक्ष नंदकुमार चिले, सुप्रिया दळवी, मनविसे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर व शिवडी विधानसभा पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी पदाधिका-यांनी विजयाच्या प्रकृतीची चौकशी केली व तिला हिम्मत दिली. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ.प्रविण बांगर यांच्याकडून तिच्या उपचाराची माहिती घेतली.

chetan

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कानूर बुद्रुक येथील भावेश्वरी संदेश विद्यालयात आठवीमध्ये विजया निवृत्ती चौगुले शिक्षण घेते. शाळेत सांगितलेला शालेय प्रकल्प पूर्ण न केल्याबद्दल तिला तब्बल ५०० उठाबशा काढण्याची शिक्षा मुख्याध्यापिका देवणे यांनी दिली होती.३०० उठाबशा काढल्यानंतर तिच्या उजव्या पायाच्या नसा सुजून रक्तपुरवठा गोठला व ती भोवळ येऊन जाग्यावर कोसळली.त्यानंतर तिला कोल्हापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल तिला कोल्हापूरहून मुंबईच्या केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उठाबशाची शिक्षा देणा-या शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी देवणेला पोलिसांनी अटक केली आहे.