बेल्ह्याचे नवनिर्वाचित सरपंच राजाभाऊ गुंजाळ मला आमदार करणार आहेत- आशाताई बुचके

aashatai buchke

टिम महाराष्ट्र देशा : जुन्नर तालुक्यातील अतिशय महत्वाची मानली जाणारी बेल्हा ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे . यात शिवसेनेचे माजी जि.प. सदस्य राजाभाऊ गुंजाळ यांच्या हातात महत्वाचे व्यापारी केंद्र असलेल्या बेल्हे ग्रामपंचायतीच्या तिजोरीच्या चाव्या आलेल्या आहे.

आज दि . २८ रोजी राजाभाऊ यांची ४४७ मताधिक्यांनी निवड होऊन. त्यांच्या नवनियुक्ती बद्दल तालूक्यातील जि.प.शिवसेना गटनेत्या आशाताई बुचके , माऊली खंडागळे आदी शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच नारायणगावातही ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे बाबू पाटे यांनी सरपंच पदाच्या रूपातून मोहर लावल्याने आशाताई बुचके यांनी १००% खात्री आहे की मी २०१९ च्या जून्नर मतदार संघातून खा. शिवाजी आढळराव यांच्या पाठींब्यातून आणि नारायणगाव सरपंच बाबू पाटे व राजाभाऊ गुंजाळ या खंदे कार्यकर्त्यांच्या जोरावर थेट विधानसभेवर जून्नर तालूक्यातून आमदारकीची मोहर उमटवणार आहे यात शंका नाही. आशाताई बुचके आज बेल्हा या ठीकाणी नवनिर्वाचित सरपंच राजाभाऊ गुंजाळ यांच्या विजयीसभेत त्या बोलत होत्या.